Join us  

बोरिवलीतील इमारतीच्या तळमजल्यावर लागली भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 8:38 PM

A huge fire broke out in Borivali : या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 

मुंबईतील पश्चिम उपनगरातील बोरिवली इथे इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला कळवण्यात आली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 

बोरिवली येथील पश्चिम लिंक रोड येथील ऑलिव्ह अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या आगीत मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

 

टॅग्स :आगअग्निशमन दलमुंबई