Join us
Daily Top 2Weekly Top 5

घाटकोपर येथे श्रीजी टॉवरमधील फ्लॅटला लागली भीषण आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 18:49 IST

घटनास्थळी ४ फायर इंजिन आणि ३ पाण्याचे टँकर दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.श्रीजी टॉवर ही दहा माजली इमारत असून या टॉवरच्या ५ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये लागली

मुंबई - घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रोड - ४ वर असलेल्या श्रीजी या रहिवाशी इमारतीतील एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली. श्रीजी टॉवर ही दहा माजली इमारत असून या टॉवरच्या ५ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये लागली. ही आग आज सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास लागली. घटनास्थळी ४ फायर इंजिन आणि ३ पाण्याचे टँकर दाखल झाले आहेत.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात येत आहेत. नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप कळलेले नाही.

टॅग्स :आगपुणे अग्निशामक दलमुंबईघाटकोपर