Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझी जागा वैमानिकाला कशी दिली; प्रवाशाकडून संताप व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:51 IST

नीलेश बन्सल असे या प्रवाशाचे नाव आहे. त्याने त्याचा संताप सोशल मीडियावरून व्यक्त केला आहे. 

मुंबई : वैमानिकाला आराम मिळावा म्हणून एअर इंडियाने एका प्रवाशाचे बिझनेस क्लासचे बुकिंग रद्द करून त्याला इकोनॉमी श्रेणीने प्रवास करायला लावल्याच्या घटनेनंतर सोशल मीडियावर वादंग उठला आहे. नीलेश बन्सल असे या प्रवाशाचे नाव आहे. त्याने त्याचा संताप सोशल मीडियावरून व्यक्त केला आहे. 

त्याने लिहिले की, मी दिल्लीहून प्रवास करणार होतो. माझ्यासोबत माझा चार वर्षांचा मुलगा देखील होता. आरामदायी प्रवास व्हावा यासाठी मी माझे आणि मुलाचे बिझनेस क्लासचे बुकिंग केले होते. मात्र, विमानतळावर पोहोचल्यावर माझे बिझनेस क्लासचे बुकिंग रद्द करत मला इकोनॉमी श्रेणीतून प्रवास करावा लागेल असे सांगण्यात आले.

मी याचे कारण विचारले असता, वैमानिकाला आराम करायचा असल्यामुळे त्याला तुमचे आसन दिल्याचे कंपनीने सांगितले. मी पैसे भरले तर प्रवासी महत्त्वाचा की वैमानिक असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. तसेच वैमानिकाला विश्रांती हवी हेदेखील मी समजू शकतो, मात्र, याची पूर्व कल्पना कंपनीला नव्हती का, असा सवाल त्याने उपस्थित केला.

टॅग्स :एअर इंडिया