मुंबई : मुंबई महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वायुप्रदूषण मोजले जाते. मात्र, वायुप्रदूषणात कोणते विषारी घटक आहेत, प्रदूषण रोखण्यासाठी कोणते उपाय योजले पाहिजेत? याची माहिती दिली जात नाही. वायुप्रदूषणासंदर्भात कार्यरत संस्थांच्या मदतीने हे काम करावे. अन्यथा वायुप्रदूषणाचे आकडे देऊन प्रदूषण कमी होणार नाही.
मुंबई महानगरात शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू आहे. इमारतींमधून उडणारी धूळ रोखण्यासाठी संबंधित महापालिकांनी बिल्डरांना बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, बिल्डर तेथे आच्छादन लावण्याशिवाय काहीच करत नाहीत. प्रत्येक बांधकाम साइट्सच्या ठिकाणी वायुप्रदूषण मोजणारी यंत्रणा बसवली पाहिजे. जेणेकरून प्रकल्पातून दूषण होते, हे समजू शकेल. या गोष्टी बिल्डरला बंधनकारक केल्या पाहिजेत.
प्राधिकरणांनी एकत्र यावेमहापालिका, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), महानिर्मिती, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांसारखी उद्याने या सगळ्या प्राधिकरणांनी एकत्र काम केले पाहिजे. मात्र आपल्याकडे समन्वयाचा अभाव दिसतो. सर्व प्राधिकरणांनी समन्वय ठेवल्यास प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.