Join us

दक्षिण मुंबईत पावसाचे पाणी साचलेच कसे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 04:30 IST

सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले : स्थायीच्या बैठकीत नालेसफाईच्या वाढीव खर्चावर आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पावसाळा संपला आणि हिवाळा सुरू झाला तरी नालेसफाईचा मुद्दा गाजतोच आहे. बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीतही नालेसफाईचा मुद्दा गाजला.

नालेसफाईसाठी झालेल्या वाढीव खर्चाच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. मुळात मुंबईत पाणी तुंबलेच कसे? या मुद्द्यासह नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वाढीव खर्चावरही सवाल करत या खर्चाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबतच्या वाढीव खर्चाचा तपशील प्रशासनाकडे समितीने फेरविचारासाठी पाठविला आहे. शिवाय याबाबतच्या निविदा प्रक्रियेच्या चौकशीचे निर्देशही देण्यात आले.मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नालेसफाईसाठी वाढीव खर्च कंत्राटदाराला देण्याच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला. मुंबईत यावर्षी २४५ ऐवजी ३५० ठिकाणी पाणी साचले, असे म्हणत नालेसफाई करण्यावर प्रश्न उपस्थित केले. ज्या दक्षिण मुंबईत कधी पाणी साचत नव्हते तेथे कसे पाणी साचले? याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.

कंत्राटदारांची बिले रोखण्याचे निर्देशभाजपनेही नालेसफाईवरून प्रशासनाला घेरले. ११३ टक्के नालेसफाईचा दावा कशाच्या आधारे करण्यात आला, असा सवालही उपस्थित करण्यात आला. तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याबाबतच्या निविदेची चौकशी करा, त्याचा अहवाल मांडा, ज्यांनी कामात कुचराई केली आहे, अशा कंत्राटदाराची बिले रोखा, असे निर्देश दिले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाऊस