फसवणुकीपासून संरक्षण कसे करावे, आता 'बीग बी' करणार जागृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 06:31 IST2020-09-28T06:30:21+5:302020-09-28T06:31:51+5:30
रिझर्व्ह बँकेच्या बँक ग्राहक जागृती अभियानात आपण सहभागी होत असून, ग्राहकांना फसवणूकीपासून संरक्षण कसे करता येईल.

फसवणुकीपासून संरक्षण कसे करावे, आता 'बीग बी' करणार जागृती
मुंबई : बँकेच्या ग्राहकांनी फसवणुकीपासून कसे संरक्षण करावे यासाठी आता ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन तथा बीग बी हे रिझर्व्ह बँकेच्या जागृती अभियानात सहभागी होणार आहेत. बच्चन यांनी आपल्या टष्ट्वीटर हँण्डलवर याची माहिती दिली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या बँक ग्राहक जागृती अभियानात आपण सहभागी होत असून, ग्राहकांना फसवणूकीपासून संरक्षण कसे करता येईल. याचा संदेश देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माहितीच्या अभावी सर्वसामान्य नागरिकांना आपली पुंजी गमवावी लागते असेही ते म्हणाले.