बॅंकांना डिसेंबरमध्ये किती दिवस सुट्ट्या?; घ्या जाणून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 13:39 IST2023-11-24T13:38:33+5:302023-11-24T13:39:10+5:30
वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बँकांचे काम ठप्प राहू शकते.

बॅंकांना डिसेंबरमध्ये किती दिवस सुट्ट्या?; घ्या जाणून
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवाळी आणि सणासुदीनंतर आता या वर्षातील अखेरचा महिना डिसेंबरमध्येही बँकांना बऱ्याच सुट्या आल्या आहेत. या महिन्यात १८ दिवस बँकांचे कामकाज हाेणार नाही. त्यात रविवार आणि दाेन शनिवारसह ११ दिवसांच्या इतर सुट्या आहेत. याबाबत ‘आरबीआय’ने यादी प्रसिद्ध केली आहे. याशिवाय सरकारी बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यादिवशी वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बँकांचे काम ठप्प राहू शकते.