Join us  

अर्ध्याच शाळांच्या तपासणीअंती ओझे कळणार कसे?; सामाजिक कार्यकर्ते, पालकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 5:41 AM

न्यायालय आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिले. त्यानंतरही अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे किती तरी अधिक असल्याचा आरोप पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे

मुंबई : न्यायालय आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिले. त्यानंतरही अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे किती तरी अधिक असल्याचा आरोप पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याची तपासणी केली. तपासणीअंती ओझे मानकाप्रमाणे असल्याचा अहवाल सादर केला. मात्र, केवळ अर्ध्याच शाळांची तपासणी करून अहवाल तयार केल्याने दप्तराचे नेमके ओझे कसे समजणार, असा प्रश्न पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.अहवालानुसार आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान राज्यातील २३ हजार ४४३ जिल्हा परिषद तसेच सरकारी शाळांतील ४ लाख १७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये केवळ ५,१४१ विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराच्या ओझ्याचा अतिरिक्त भार आढळला. तर, ९८.७७ टक्के विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे मानकानुसार असल्याचे सांगण्यात आले.मुंबई उपनगरातील ७०६ शाळांपैकी ४१२ तर मुंबईतील २७९ शाळांपैकी १७२ शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचेही सर्वेक्षण झाले. यात मुंबईतील १०० टक्के, तर उपनगरातील ९९.६० टक्के विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे मानकानुसार आढळले. केवळ ०.४० टक्के विद्यार्थ्यांच्या पाठीवर अतिरिक्त भार आढळला. मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, सांगली, नाशिक, नंदुरबार, धुळे, अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशिम, लातूर, जालना, हिंगोली या पंधरा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर मानकाप्रमाणे दप्तराचे वजन असल्याचे पाहणीत समोर आले.अहवाल अर्धसत्यावर आधारितअर्ध्या शाळांचीच तपासणी केल्याने दप्तराच्या वजनाच्या आकड्यात तफावत असू शकते, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी केला. अर्धसत्य जाणून घेऊन अहवाल तयार करण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा संबंधित यंत्रणेला सक्ती करून, दप्तराच्या ओझ्याबाबतच्या निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी करावी व विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी चालविलेला जीवघेणा खेळ थांबवावा, असे मत स्वाती पाटील, इतर शिक्षणतज्ज्ञांसह पालक व्यक्त करत आहेत.केंद्र सरकारच्यानिर्देशानुसार दप्तराचे ओझेपहिली आणि दुसरी - १.५ किलोपेक्षा कमीतिसरी ते पाचवी - ३ किलोपेक्षा कमीसहावी आणि सातवी - ४ किलोपेक्षा कमीआठवी आणि नववी - ४.५ किलोपेक्षा कमीदहावी - ५ किलोपेक्षा कमी

टॅग्स :शाळाविद्यार्थी