Join us

माझगाव, दादर २८, चेंबूर आणि पवई १८ अंशावर घाटकोपर ‘ऊबदार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 06:11 IST

मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक नोंदविण्यात येत आहे.

मुंबई : विदर्भातील बहुतांशी शहरांत गारठा जाणवत असून, ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागत असतानाच मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचा फरक नोंदविण्यात येत आहे. माझगाव, दादर आणि पवई येथील कमाल तापमान २८ अंश तर चेंबूर आणि पवई येथील किमान तापमान १८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. विशेषत: पूर्व उपनगरातील घाटकोपर हे ठिकाण ‘ऊबदार’ म्हणून नोंदविण्यात आले आहे.

हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १३.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे.

राज्यासाठी अंदाज

१३ ते १४ डिसेंबर : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.

१५ ते १६ डिसेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.

मुंबईसाठी अंदाज

शुक्रवारसह शनिवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २२ अंशाच्या आसपास राहील.

टॅग्स :विधानसभा हिवाळी अधिवेशनमुंबईघाटकोपरहवामान