Honor of Raj Rajeshwari Pratishthan on appeal of Government; Citizens' spontaneous response to blood donation | सरकारच्या आवाहनाला राज राजेश्वरी प्रतिष्ठानचा मान; रक्तदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सरकारच्या आवाहनाला राज राजेश्वरी प्रतिष्ठानचा मान; रक्तदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

- मुकेश चव्हाण

राज्यात काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आपल्याकडे शिल्लक असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अनेक मंडळांना राक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. सरकारच्या या आवाहनाला मान देत ताडदेवमधील राज राजेश्वरी प्रतिष्ठानने आज रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारने 14 एप्रिल पर्यंत लॉकडॉऊन ठेवण्याचे आदेश जारी केले आहे.


जमावबंदी आणि एकंदर परिस्थिती पाहता ज्या नागरिकांना रक्तदान करायचे आहे, त्यांनी राज राजेश्वरी प्रतिष्ठानच्या सदस्यांना संपर्क करण्यास सांगितले होते. रक्तदान करण्याच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी रक्तदान करण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांना एक ठराविक वेळ देण्यात आली होती. या दिलेल्या वेळेनुसार रक्तदान घेण्यात आले अशी माहिती राज राजेश्वरी मंडळातील सदस्य योगेश खामकर यांनी दिली.

शिबीरास भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल राज राजेश्वरी प्रतिष्ठान रक्तदात्यांचे आभारी आहे. तसेच मुंबईतला पहिला चैत्र नवरात्रोत्सव साजरा करणारं मंडळ म्हणून राज राजेश्वरी प्रतिष्ठानची ओळख आहे. दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राज राजेश्वरी प्रतिष्ठान आजोजित केले जातात असं अर्षक पवार , अतुल विचारे, अमित मोरे आणि हर्षल गुरव यांनी सांगितले.

Web Title: Honor of Raj Rajeshwari Pratishthan on appeal of Government; Citizens' spontaneous response to blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.