Join us

होम क्‍वारंटाइन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का, घराबाहेर पडल्यास गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 06:37 IST

Home quarantine : मुंबईत सध्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित ८१ हजार ८३८ नागरिक होम क्‍वारंटाईन आहेत.

मुंबई : सांताक्रुझ येथील हॉटेलमधून चार प्रवाशांनी पलायन केल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे लक्षणे नसल्याने होम क्‍वारंटाईन असणाऱ्या बाधित रुग्णांवर आता महापालिकेचे लक्ष असणार आहे. अशा रुग्णांच्या हातावर पूर्वीप्रमाणे शिक्का मारण्यात येणार आहे. तसेच अशा व्‍यक्तींना दिवसातून पाच ते सहा वेळा फोन करून ते घरी असल्‍याची खातरजमा केली जाणार आहे. मात्र त्यांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.मुंबईत सध्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित ८१ हजार ८३८ नागरिक होम क्‍वारंटाईन आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्ण, संशयित लोकांनी अनुक्रमे १४ दिवस व बाधित नसल्याचा अहवाल येईपर्यंत सात दिवस क्‍वारंटाईन होणे बंधनकारक आहे. मात्र काही रुग्ण हा नियम मोडत आहेत. बाधित व्‍यक्तींची योग्‍य माहिती ठेवून त्‍यांच्‍या संपर्कातील व्‍यक्तींचेही विलगीकरण केले जाणार आहे. 

सक्तीने क्‍वारंटाइन पालिकेचे नियम मोडून घराबाहेर पडलेल्या बाधित रुग्णाबाबत तक्रार आल्यास विभाग स्तरावरील वॉर रुममार्फत अशा रुग्‍णांवर गुन्‍हे दाखल केले जाणार आहेत. अशा रुग्‍णांना सक्‍तीने संस्‍थात्‍मक विलगीकरण (इन्‍स्‍ट‍िट्यूशनल क्‍वारंटाईन) येथे ठेवले जाणार असल्याचा प्रशासनाने इशारा दिला आहे.ब्राझीलमधून येणाऱ्यांचे संस्‍थात्‍मक विलगीकरणमुंबई विमानतळावर ब्राझीलमधून येणाऱ्या प्रवाशांना सक्‍तीने सात दिवसांच्‍या संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवण्‍यात येणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे लाेकांनी काळजी  घेण्याची गरज आहे. सर्वांनी मास्कचा वापर, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा वापर करावा.     - डॉ. राहुल पंडित,     सदस्य, टास्क फोर्स 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई