Join us  

होम क्वारंटाइन रुग्णांमध्ये महिनाभरात 20 टक्के घट, सध्या पाच लाख दोन हजार गृह अलगीकरणात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 9:00 AM

फेब्रुवारीच्या मध्यान्हापासून मुंबईत कोरोनाची दुसरी लाट धडकली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने फेब्रुवारी अखेरीस ९६ हजार लोकं गृह अलगीकरणात होते. दररोज नऊ ते दहा हजार बाधित रुग्ण सापडत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ९० हजारांवर पोहोचली होती.

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले तरी त्यापैकी ८० टक्के रुग्ण हे लक्षणविरहीत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. अशा रुग्णांना शक्यतो होम क्वारंटाइन केले जात असल्याने गेल्या महिन्याभरात घरातच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र, कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असल्याने गृह अलगीकरणातील नागरिकांच्या संख्येतही महिन्याभरात २० टक्के घट झाली आहे. सध्या पाच लाख दोन हजार १०१ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. फेब्रुवारीच्या मध्यान्हापासून मुंबईत कोरोनाची दुसरी लाट धडकली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने फेब्रुवारी अखेरीस ९६ हजार लोकं गृह अलगीकरणात होते. दररोज नऊ ते दहा हजार बाधित रुग्ण सापडत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ९० हजारांवर पोहोचली होती. १५ मार्चपर्यंत मुंबईत दोन लाख ११ हजार लोकं गृह अलगीकरणात होती. ३१ मार्चपर्यंत चार लाख ८७ हजार ९६४, तर १० एप्रिल रोजी  ही संख्या सहा लाख २७ हजारांवर पोहोचली होती.

होम क्वारंटाइन- १० एप्रिल - सहा लाख २७ हजार- १० मे  - पाच लाख दोन हजार

या आहेत अटीस्वतंत्र खोली आणि स्वतंत्र शौचालय असल्यास होम क्वारंटाइन होण्यास परवानगी देण्यात येते. मात्र, मास्क आणि ग्लोव्हज् वापरणे, ऑक्सिमीटरच्या मदतीने दैनंदिन तपासणी करुन त्यांची नोंद ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे. तर काही रुग्ण कोरोना काळजी केंद्र, संस्थात्मक विलगीकरण याठिकाणी राहतात. तसेच खाटांची संख्या कमी असल्याने लक्षणविरहीत व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच उपचार घेण्यास सांगण्यात येते. 

एप्रिल २०२०पासून - आतापर्यंत ६४ लाख ८४ हजार २२२ लोकांनी गृह अलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे.- तर सध्या ९२९ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून, एक लाख ५५ हजार १४० रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसऑक्सिजनहॉस्पिटलडॉक्टरकोरोनाची लस