Join us

‘दिशा’ कायदा जाणून घेण्यासाठी गृहमंत्री जाणार आंध्र प्रदेशला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 03:12 IST

या दौºयात गृहमंत्र्यांसमवेत गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई,

मुंबई : महिलांविरोधातील अत्याचारांबाबत राज्य सरकार संवेदनशील आहे. याबाबत कठोर कायदा करण्याचा मानस आहे. त्यासाठी आंध्र प्रदेशच्या ‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २० फेब्रुवारीला हैदराबादला जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली.

या दौºयात गृहमंत्र्यांसमवेत गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, गृहविभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, महिला व बालकांवरील अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या अस्वती दोर्जे असणार आहेत.

टॅग्स :गृह मंत्रालयबलात्कारअनिल देशमुख