क्षयरोग, कुष्‍ठरोग नियंत्रणासाठी 50 लाख नागरिकांची घरोघरी होणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 01:12 AM2020-11-30T01:12:09+5:302020-11-30T01:31:05+5:30

मोफत क्ष-किरण तपासणीसाठी व्हाउचर 

Home inspection of 50 lakh citizens for tuberculosis and leprosy control | क्षयरोग, कुष्‍ठरोग नियंत्रणासाठी 50 लाख नागरिकांची घरोघरी होणार तपासणी

क्षयरोग, कुष्‍ठरोग नियंत्रणासाठी 50 लाख नागरिकांची घरोघरी होणार तपासणी

Next

मुंबई: दक्षयरोग व कुष्‍ठरोग नियंत्रणासाठी १ ते १६ डिसेंबर दरम्‍यान महापालिकेचे पथक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्‍यान हे सर्वेक्षण होणार असून, घरातील व्‍यक्‍ती कामानिमित्त बाहेर असल्‍यास दिवसातील इतर वेळीही तपासणी केली जाईल. १२ लाख १२ हजार ६९३ घरातील ५० लाख ९ हजार २७७ व्‍यक्‍तींची क्षयरोग व कुष्‍ठरोग तपासणी करण्‍यात येणार आहेत. तपासणीसाठी ३ हजार ४५१ पथके कार्यरत आहेत.

प्राथमिक तपासणीत क्षयरोग संशयित रुग्‍णांच्‍या बेडख्‍याची तपासणी करण्‍यासह क्ष-किरण चाचणी  होईल. ही चाचणी महापालिकेच्‍या, सरकारी प्रयोगशाळेत मोफत केली जाईल. क्ष-किरण चाचणी  खासगी क्ष-किरण केंद्रामध्‍ये मोफत केली जाईल. यासाठी व्‍हाउचर दिले जाईल.  क्षयरोगाची बाधा आढळली तर मोफत औषधोपचार दिले जातील. तर कुष्‍ठरोग संशयितांना नजीकच्‍या दवाखान्‍यात, रुग्‍णालयात संदर्भित केले जाईल. वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाईल.
 

क्षयरोगाची लक्षणे

  • १४ दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असणे
  • दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ ताप असणे
  • सायंकाळच्‍या वेळेस ताप येणे
  • वजनात लक्षणीय घट होणे
  • थुंकीमधून रक्‍त पडणे, छातीत दुखणे,नेवर सूज असणे

 

कुष्‍ठरोगाची लक्षणे

  • त्‍वचेवर फिकट – लालसर चट्टा असणे, त्‍या ‍ठिकाणी घाम न येणे
  • जाड – बधिर – तेलकट चकाकणारी त्‍वचा कानाच्‍या पाळ्या जाड होणे
  • भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे
  • तळहातावर व तळपायावर मुंग्‍या येणे, बधिरपणा व जखमा असणे
  • त्‍वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे
  • हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे
  • हात व पायांमध्‍ये अशक्‍तपणा जाणवणे
  • हातातून वस्‍तू गळून पडणे, चालताना पायातून चप्‍पल गळून पडणे

Web Title: Home inspection of 50 lakh citizens for tuberculosis and leprosy control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.