मुंबई : दक्षिण मुंबईतील सीएसएमटी मेट्रो सिनेमालगत बोअरवेल खोदकाम करताना मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारी बोगद्याला धक्का लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चंद्रमा वॉटर सप्लाय प्रा. लि.चे मालक रामबाबू राय यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ मार्च रोजी घडली असून, १३ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे, मेट्रो मार्गिकेच्या दोन्ही बाजूंनी ५० मीटर परिसरात कोणतेही खोदकाम किंवा बांधकाम करण्यापूर्वी एमएमआरसीची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असताना संबंधित कंपनीने ती घेतली नव्हती. तसेच महापालिकेचीही परवानगी घेतली नसल्याचे चौकशीत समोर आले.
नेमके काय घडले?मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो सिनेमा परिसरातील मेट्रोलगत बोअरवेल खोदण्याचे काम सुरू होते. ड्रीलिंग करत असताना जमिनीखालील मेट्रो-३च्या बोगद्याला डाव्या बाजूला एक लहान छिद्र पडले. ही बाब लक्षात आल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. चौकशीअंती हा प्रकार उघडकीस आल्यानंतर १३ मार्च रोजी गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : Borewell drilling near Metro Cinema in Mumbai damaged the Metro-3 tunnel. Chandra Water Supply owner booked for unauthorized drilling. The incident occurred on March 5th; FIR filed March 13th. MMRC permission was not taken.
Web Summary : मुंबई में मेट्रो सिनेमा के पास बोरवेल ड्रिलिंग के दौरान मेट्रो-3 सुरंग क्षतिग्रस्त हो गई। बिना अनुमति के ड्रिलिंग के लिए चंद्र वाटर सप्लाई के मालिक पर मामला दर्ज। घटना 5 मार्च को हुई; 13 मार्च को एफआईआर दर्ज की गई। एमएमआरसी से अनुमति नहीं ली गई थी।