मोखाड्यात टँकर चालकाला मारहाण

By Admin | Updated: May 22, 2014 04:10 IST2014-05-22T04:10:26+5:302014-05-22T04:10:26+5:30

मोखाडा तालुक्यात ६६ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. या ठिकाणी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

Hit the tanker driver in the market | मोखाड्यात टँकर चालकाला मारहाण

मोखाड्यात टँकर चालकाला मारहाण

मोखाडा : मोखाडा तालुक्यात ६६ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. या ठिकाणी १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. धामणी येथे पाणीपुरवठा करण्यासाठी गेलेल्या टँकरचालक जयंत दबडे (माने) या टँकरचालकास मारहाण करण्यात आल्याने टँकरचालकांनी पाणीपुरवठा करण्यास असहकार केला होता. परंतु मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रकाश निकम यांनी यशस्वी मध्यस्थी करून पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू करण्यात आला आहे. मौजे धामणी येथे पाणी टाकण्यासाठी गेलेल्या टॅँकरवर चढून ग्रामस्थांनी पाण्यासाठी रेलचेल केली. त्यावेळी टँकरचालक जयंत दबडे याने टॅँकरवरून पडून इजा होईल, असे समजावीत असताना त्याचे काहीएक ऐकून न घेता उलटपक्षी त्यालाच मारहाण करण्यात आल्याने काही काळ वातावरण चिघळले होते. याबाबत विचारणा केली असता त्र्यंबकेश्वरहून डिझेलची तजविज करण्यात आली असून ते उपलब्ध टँकरला देण्यात येईल असे मासलेवाईक उत्तर पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे. पाणी पुरवठ्याचा हा अखेरचा टप्पा असून गावागावांमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे. अपुरा पाणी पुरवठा तांत्रिक अडचणी आणि पाणीपुरवठा टँकरचालकांसारख्या निष्पाप माणसाला जनक्षोभाशी सामना करावा लागत आहे. परंतु पाणी पुरवठा ही बाब सामान्यपणे घेत असून अशी परिस्थिती उद्भवू नये याबाबत कोणतेही सकारात्मक प्रयत्न केले जात नाहीत. मागील टंचाई हंगामातही अशीच परिस्थिती होती. वर्षानुवर्षे पाणीपुरवठा विभागात कोणतेच बदल दिसत नसल्याने टंचाईग्रस्त गावे हवालदिल झालेली आहेत. (वार्ताहर)

Web Title: Hit the tanker driver in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.