पैसे मागितल्याने कर्मचाऱ्यास मारहाण, लोअर परळ स्थानकाच्या शौचालयातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 02:09 IST2018-06-08T02:09:47+5:302018-06-08T02:09:47+5:30

रेल्वे स्थानकातील शौचालयात शौचास जाण्यास पैसे मागितले म्हणून स्थानिकांनी कामगाराला मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री घडला. मारहाण झालेल्या इसमाचे नाव आदर्श कुमार यादव आहे.

Hit the employee due to asking for money, type of toilets in lower Parel station | पैसे मागितल्याने कर्मचाऱ्यास मारहाण, लोअर परळ स्थानकाच्या शौचालयातील प्रकार

पैसे मागितल्याने कर्मचाऱ्यास मारहाण, लोअर परळ स्थानकाच्या शौचालयातील प्रकार

मुंबई : रेल्वे स्थानकातील शौचालयात शौचास जाण्यास पैसे मागितले म्हणून स्थानिकांनी कामगाराला मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री घडला. मारहाण झालेल्या इसमाचे नाव आदर्श कुमार यादव आहे. पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्थानकावर उत्तर दिशेला असलेल्या शौचालयाच्या बाहेर इच्छेनुसार पैसे देणे असा फलक लावण्यात आला आहे. सदर शौचालय खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आले आहे. त्याने ३० मेपासून मुतारीसाठीही पैसे घेण्यास सुरुवात केली आहे.
गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास दोन इसम शौचासाठी आले. या वेळी कामगाराने संबंधिताकडे पैशाची मागणी केली. आम्ही येथेच राहत असून आमच्याकडून पैसे का घेतो? असे बोलत संबंधित व्यक्तींनी कामगाराला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून स्थानकातील नागरिकांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर संबंधित तरुणांनी तेथून पळ काढला. यात हा कर्मचारी जखमी असून नजीकच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Hit the employee due to asking for money, type of toilets in lower Parel station

टॅग्स :Crimeगुन्हा