Historical vaccinations begin today in india | देशात आजपासून ऐतिहासिक लसीकरणाला आरंभ

देशात आजपासून ऐतिहासिक लसीकरणाला आरंभ

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या काेविड १९ विषाणूविरुद्ध लढण्यासाठी जगातील सर्वात माेठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण माेहिमेचा आज आरंभ हाेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी व्हीडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून माेहिमेचे उद्घाटन करणार आहेत. यासाठी शहरांसह जिल्हा आणि ग्रामपातळीवरील लसीकरण केंद्रे सज्ज झाली आहे. दाेन लसींचा वापर या माेहिमेत केला जाणार आहे. 

देशातील काेविड याेद्ध्यांचे सर्वप्रथम लसीकरण करण्यात येईल. त्यात आराेग्य सेवक, डाॅक्टर्स, नर्सेस, पाेलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे. केंद्रीय आराेग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. काेविड १९ च्या अंताची सुरूवात असल्याची भावना डाॅ. हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केली. पहिल्या टप्प्यासाठी १.६५ काेटी लसींचा पुरवठा सर्व राज्यांमध्ये झालेला आहे. त्यापैकी पुण्यातून १.१० काेटी लसींचे डाेस विमानांद्वारे देशभरात पाेहाेचविण्यात आले आहेत. लस वितरणाला १२ जानेवारीपासून सुरूवात झाली हाेती.

‘काेविन’द्वारे नजर
n लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने ‘काेविन’ ही डिजिटल यंत्रणा सरकारने उभारली आहे. 
n त्याद्वारे प्रत्येक लसीकरण केंद्रातील लसींचा साठा, तापमान इत्यादींची अपडेट माहिती उपलब्ध हाेणार आहे. 
n केंद्र सरकारच्या नियंत्रण कक्षाचे यावर लक्ष राहणार आहे. लस घेणाऱ्या प्रत्येकाची नाेंद ‘काेविन’ यंत्रणेमध्ये करण्यात आली आहे.

राज्यात ५११ केंद्रे झाली सज्ज
महाराष्ट्रात मुंबईतील बीकेसी येथील लसीकरण केंद्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ हाेणार आहे. महाराष्ट्रात काेराेनाची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यातुलनेत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राला ९ लाख ६३ हजार लसी पुरविण्यात आल्या आहेत. राज्याची परिस्थिती पाहता आणखी लसींची मागणी करण्यात आली आहे. राज्यात ८ लाख जणांना पहिल्या टप्प्यात लस टाेचण्यात येणार आहे. त्यासाठी ५११ केंद्रे सज्ज झाली आहेत.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Historical vaccinations begin today in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.