बटनवाल्या टॅक्सीविरोधात ‘खळ्ळखट्याक’चा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 06:12 AM2019-09-16T06:12:46+5:302019-09-16T06:12:53+5:30

टॅक्सी मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या टॅक्सीचालकांविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे वाहतूक सेनेने दिला आहे.

Hint of a 'bump' against a buttoned taxi | बटनवाल्या टॅक्सीविरोधात ‘खळ्ळखट्याक’चा इशारा

बटनवाल्या टॅक्सीविरोधात ‘खळ्ळखट्याक’चा इशारा

Next

मुंबई : टॅक्सी मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या टॅक्सीचालकांविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे वाहतूक सेनेने दिला आहे. मीटर फास्ट करण्याचे बटन बसवून प्रवाशांची लूट केली जात असल्याचा व्हिडीओ अलीकडेच वाहतूक सेनेने समाज माध्यमांवर प्रसारीत केला होता. मंगळवारी प्रत्यक्ष मीटर फास्ट करण्याचा व्हिडीओ प्रसारीत केला जाणार असून, त्यानंतर थेट टॅक्सी चालकांविरोधात पवित्रा घेण्याचा इशारा मनसे वाहतूक सेनेने दिला आहे.
मनसे वाहतूक सेनेचे नितीन नांदगावकर यांनी शनिवारी मीटर फास्ट करण्याचे रॅकटे असल्याचा दावा व्हिडीओद्वारे केला होता. तब्बल ८० टक्के टॅक्सीमध्ये अशाप्रकारचे मीटर आहेत. दादर, भायखळा, मुंबई सेन्ट्रल, कुर्ला ,चर्चगेट, बांद्रा, विमानतळ अशा विविध ठिकाणी अशा टॅक्सी सुरू आहेत. वाहतूक पोलिसांना या सर्व गैरप्रकारांची कल्पना आहे. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचा आरोप नांदगावकर यांनी केला. पोलिसांनी अशा मीटरविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
>‘पोलिसांनी वेळीच कारवाई करावी’
मुंबईत विविध ठिकाणी टॅक्सी मीटरमध्ये फेरफार करून दिले जातात. मीटर फास्ट करण्याचे बटन कसे बसविले जाते, टॅक्सीमध्ये कुठेकुठे अशा प्रकारचे बटन असतात याचा व्हिडीओ येत्या मंगळवारी सोशल मीडियावर प्रसारीत केला जाणार आहे. दरम्यानच्या काळात वाहतूक पोलिसांनी बटन टॅक्सीविरोधात कारवाई करावी अन्यथा मंगळवारनंर मनसे आपल्या पद्धतीने या टॅक्सींचा समाचार घेईल, असा इशाराही नांदगावकर यांनी दिला. राजरोसपणे मुंबईकरांची
लूट केली जात आहे पोलीस
प्रशासन याबाबत मूग गिळून गप्प आहे. प्रवाशांची ही अशी लूट
चालू देणे म्हणजे एकप्रकारचा दरोडाच असल्याचा आरोपही
त्यांनी केला.

Web Title: Hint of a 'bump' against a buttoned taxi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.