मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी डिसेंबरमध्ये विवाहबद्ध होणार आहे. ईशाचा विवाह आनंद पिरामल यांच्याशी होईल. यानंतर हे नवदाम्पत्य वरळी सीफेसला राहायला जाईल. ईशा अंबानी सध्या अँटेलियामध्ये वास्तव्यास आहे. मुकेश अंबानी यांचं हे निवासस्थान देशातील सर्वात महागड्या निवासस्थानांपैकी एक आहे. मात्र ईशा अंबानी यांचं नवं घरदेखील सोयीसुविधांनी युक्त आहे. मुलगा आनंदसाठी वडिल अजय पिरामल यांनी तब्बल 452 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. ईशा आणि आनंद 12 डिसेंबरला विवाहबद्ध होतील. यानंतर हे दाम्पत्य वरळी सीफेसला राहायला जाईल. ईशा आणि आनंद यांचा हा नवा बंगला पाच मजल्यांचा आहे. हा बंगला 50 हजार चौरस फुटांचा आहे. आनंद यांचे आई-वडिल अजय आणि स्वाती पिरामल यांच्याकडून हा बंगला आनंद आणि इशा यांना गिफ्ट म्हणून देण्यात येईल.
लग्नानंतर 'इथं' राहणार अंबानींची लेक; वरळी 'सी-फेस'च्या बंगल्यात थाटणार संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 13:09 IST