Join us  

जुलै महिन्यात मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 6:05 AM

मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी दिवसभर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या.

मुंबई : मुंबईत बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची ६५.१ मिलीमीटर नोंद झाली असतानाच जुलै महिन्यात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक पावसाची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत जुलै महिन्यात १ हजार ४६४ मिलीमीटर पाऊस पडला असून, १९५९ सालानंतर २०१४ सालच्या जुलै महिन्यात मुंबईत १ हजार ४६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पडलेला हा सर्वाधिक मोठा दुसरा पाऊस आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी दिवसभर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. विशेष म्हणजे मंगळवारी रात्रीदेखील पावसाचा जोर कायम होता. बुधवारी सकाळनंतर मात्र कोसळलेल्या पावसाने विश्रांती घेतली. कुठे तरी कोसळलेली मुसळधार सर वगळता मुंबई तशी बुधवारी कोरडीच होती. मुंबई शहरात फोर्ट येथे बुधवारी दुपारी ४ वाजता तुरळक ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या तर उपनगरात सकाळी तुरळक ठिकाणी पावसाची रिपरिप होती. दरम्यान, ४ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. ११ शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ७४ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.कोकणाला अतिवृष्टीचा इशारा१-२ आॅगस्ट : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि गोवा किनारी सोसाट्याचा वारा वाहील.३ आॅगस्ट : कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि गोवा किनारी सोसाट्याचा वारा वाहील.४ आॅगस्ट : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. महाराष्ट्र आणि गोवा किनारी सोसाट्याचा वारा वाहील, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.मुंबईला अंदाज : १ आॅगस्ट : मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी अधूनमधून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.या मोसमातील आतापर्यंतचा एकूण पाऊस (मिमी)कुलाबा : १ हजार ५१६.२ मिलीमीटरसांताक्रुझ : १ हजार ९७९.९ मिलीमीटरपावसाची नोंद (मिमी)माझगाव ९०मालाड १०२ठाणे ६९चिराग नगर ७३कासारवडवली ८३घणसोली ७१पवणे ११५पनवेल १०२उल्हासनगर ८५आधारवड ७६डोंबिवली ६८

टॅग्स :पाऊसमहालक्ष्मी एक्सप्रेसमुंबई