The highest infiltration in Diyarbans from Thane station | ठाणे स्थानकातून दिव्यांगांच्या डब्यात सर्वाधिक घुसखोरी
ठाणे स्थानकातून दिव्यांगांच्या डब्यात सर्वाधिक घुसखोरी

- कुलदीप घायवट

मुंबई : अनेक सर्वसामान्य प्रवासी दिव्यांग डब्यात घुसखोरी करत असल्याने दिव्यांग प्रवाशांची गैरसोय होते. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. सप्टेंबरमध्ये केलेल्या या कारवाईअंतर्गत ठाणे स्थानकात दिव्यांग डब्यातून सर्वाधिक सर्वसामान्य प्रवासी प्रवास करीत असल्याचे उघडकीस आले आहे. अशा ४०३ घुसखोरांवर कारवाई करीत त्यांच्याकडून सुमारे एक लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढायला जागा न मिळाल्यास अनेकदा सर्वसामान्य प्रवासी कमी गर्दी असलेल्या दिव्यांग डब्यात चढतात. त्यामुळे या डब्यात गर्दी होऊन दिव्यांग प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास लक्षात घेऊनच रेल्वे सुरक्षा बलाकडून दिव्यांगांच्या डब्यात घुसखोरी करणाºया सर्वसामान्य प्रवाशांवर कारवाई करण्यात येते. सप्टेंबर २०१९ मध्ये केलेल्या या कारवाईअंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून १ हजार २८२ जणांवर कारवाई करून ३ लाख २१ हजार १३४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ठाणे स्थानकातून दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करणाºया सर्वाधिक ४०३ घुसखोरांना पकडून त्यांच्याकडून १ लाख २ हजार ९०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. ठाणे स्थानकानंतर तुर्भे आणि दादर या स्थानकांचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे स्थानकावर १३७ जणांवर कारवाई करून यातून ४२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकातून ११५ जणांवर कारवाई करून २१ हजार ६०० रुपयांची दंड वसुली करण्यात आली.

घुसखोरांवर कारवाई झालेली टॉप १५ स्थानके
(सप्टेंबर - २०१९)
स्थानक घुसखोर दंडवसुली
ठाणे ४०३ १,०२,९००
तुर्भे १३७ ४२,५००
दादर ११५ २१,६००
कल्याण ९३ २७,३००
घाटकोपर ६६ १३,२००
मानखुर्द ५५ ११,०००
वडाळा ५१ १०,२००
कुर्ला ४४ ८,८००
कर्जत ३४ ६,८००
डोंबिवली ३२ ९,३००
बदलापूर २९ ८,७००
कसारा २४ ६,०००
भायखळा २३ ४,६००
दिवा २१ ६,३००
मुलुंड २० ४,२००

Web Title:  The highest infiltration in Diyarbans from Thane station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.