Join us

Good news: महापालिका, बेस्ट, वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; २० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 06:59 IST

Diwali bonus for BMC, BEST staff: गेल्यावर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते.

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना लॉटरीच लागली आहे. २०२१ ते २०२४ या तीन वर्षांसाठी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले. पालिकेतील ९५ हजार तर बेस्ट उपक्रमाच्या ३२ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. पालिकेच्या तिजोरीवर अडीचशे कोटी रुपयांहून अधिक आर्थिक बोजा पडणार आहे.

दरवर्षी पालिका प्रशासन आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वाटाघाटीनंतर सानुग्रह अनुदानाची रक्कम जाहीर होत असते. तर बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने काहीवेळा कामगार संघटनांच्या आंदोलनानंतर सानुग्रह अनुदान जाहीर झालेे आहे.मागील दोन दिवस सानुग्रह अनुदानाबाबत बैठका सुरू होत्या. तर शुक्रवारी थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरून पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या बैठकीत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर उपस्थित होते.

गेल्यावर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. मागील दीड वर्ष कोरोना काळात पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले आहे. यामध्ये शेकडो कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या रकमेत वाढ करण्यात आली आहे. सानुग्रह अनुदानाची ही रक्कम पुढील तीन वर्षे कायम राहणार आहे.

नियमित वीज कर्मचाऱ्यांना १२ हजार, सहायक कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० बोनसवीज कंपन्यांमध्ये वर्ग-१ ते चतुर्थ श्रेणीतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना १२ हजार तर सहायक कर्मचाऱ्यांना ७ हजार २०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत शुक्रवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत केली.वीजबिलाची थकबाकी, शासनाकडून पाणीपुरवठा, पथदिवे यांच्याकडून न मिळालेले अर्थसाहाय्य तसेच कोळसा कंपनीची थकबाकी, वीजनिर्मिती करणाऱ्या शासकीय व खासगी कंपन्यांची प्रलंबित देयके, कृषीपंपांची नगण्य वीजवसुली या कारणांमुळे तिन्ही कंपन्या आर्थिक संकटातून वाटचाल करत आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक परिस्थितीचे भान ठेवून सानुग्रह अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे.

अशी आहे सानुग्रह अनुदानाची रक्कमपालिका कर्मचारी     २०,०००/-बेस्ट कर्मचारी     २०,०००/-आरोग्य सेविका     ५,३००/-(भाऊबीज भेट) माध्यमिक शिक्षक     १०,०००/-अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील कर्मचारी     १०,०००/-कॉलेजमधील शिक्षक     १०,०००/-शिक्षण सेवक     २,८००/- पार्ट टाइम शिक्षण सेवक    २,८००/- 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाउद्धव ठाकरे