वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या मानद सल्लागारपदी हेमंत टकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 07:11 PM2021-08-06T19:11:11+5:302021-08-06T19:11:22+5:30

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक तसेच नॅशनल ब्लाईंड असोसिएशन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट अशा अनेक संस्थांसाठी हेमंत टकले यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे

Hemant Takle has been appointed as the Honorary Advisor of VS Page Parliamentary Training Center | वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या मानद सल्लागारपदी हेमंत टकले

वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या मानद सल्लागारपदी हेमंत टकले

googlenewsNext
ठळक मुद्देकुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक तसेच नॅशनल ब्लाईंड असोसिएशन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट अशा अनेक संस्थांसाठी हेमंत टकले यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे

मुंबई - महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या मानद सल्लागारपदी विधानपरिषदेचे माजी सदस्य हेमंत टकले यांची नियुक्ती करण्यात आली असून ४ ऑगस्ट रोजी त्यांनी पदभार स्वीकारून कार्यारंभ केला. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हेमंत टकले यांचे अभिनंदन केले आणि आगामी काळात वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विविध प्रबोधनात्मक उपक्रम आणखी मोठ्या संख्येने आयोजित केले जावेत, अशा शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी विधानसभा सदस्य मकरंद जाधव-पाटील, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, विशेष कार्य अधिकारी डॉ. अनिल महाजन, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव संतोष पराडकर उपस्थित होते.

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक तसेच नॅशनल ब्लाईंड असोसिएशन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट अशा अनेक संस्थांसाठी हेमंत टकले यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे. त्यांनी २००८ ते २०१४ आणि २०१४ ते २०२० या कालावधीत विधानपरिषद सदस्य म्हणून देखील उल्लेखनीय योगदान दिले आहे. वाचन आणि लेखन हे छंद जोपासलेले हेमंत टकले हे उत्तमोत्तम साहित्यकृतींचे रसिक मर्मज्ञ आहेत. प्रभावी वक्तृत्व आणि नेटके सूत्रसंचालन ही त्यांची आणखी एक ओळख आहे.
 

Web Title: Hemant Takle has been appointed as the Honorary Advisor of VS Page Parliamentary Training Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.