रेशनिंगच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 12:13 PM2020-04-11T12:13:17+5:302020-04-11T12:13:47+5:30

शिधावस्तुंची माहिती अथवा तक्रारींसाठी हेल्पलाइन सुविधा चालू ठेवण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

Helpline facility for rationing complaints | रेशनिंगच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुविधा

रेशनिंगच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुविधा

Next

 

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात रेशनिंग संबंधी तक्रारींसाठी किंवा रेशनच्या माहितीसाठी हेल्पलाइन नंबर कार्यरत आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. या काळातही शिधावस्तुंची माहिती अथवा तक्रारींसाठी हेल्पलाइन सुविधा चालू ठेवण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

नागरिकांनी  हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा किंवा ईमेल वा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

(१) राज्य हेल्पलाईन

कामाचा कालावधी -सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत

हेल्पलाईन क्रमांक- १८०० २२ ४९५० / १९६७ (नि:शुल्क)

अन्य हेल्पलाईन क्रमांक- ०२२- २३७२०५८२/ २३७२२९७०/ २३७२२४८३

ईमेल- helpline.mhpds@gov.in

तर, ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी 

mahafood.gov.in या वेबसाईटचा वापर करावा. 

 

(२) मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष

कामाचा कालावधी-सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत

हेल्पलाईन क्रमांक - ०२२-२२८५२८१४

ईमेल- dycor.ho.mum@gov.in

Web Title: Helpline facility for rationing complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.