Join us
Daily Top 2Weekly Top 5

टपाल खात्यातील कोरोना बाधितांना मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 18:00 IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टपाल खात्यातील कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे.

 मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टपाल खात्यातील कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. टपाल खात्यातील कोरोना बाध‍ित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी  राज्यपालांनी आज एक लाख रुपयांचे वैयक्तिक योगदान दिले.

टपाल विभागातर्फे नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत राज्यपाल कोश्यारी यांना प्रथम क्रमाकांचे २५ हजार  रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले होते.  या रकमेत स्वत:चे ७५ हजार रुपये जोडून ही रक्कम राज्यपालांनी डाक विभागातील करोना बाध‍ित कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कल वेलफेअर फंडाला दिली.महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हर‍िशचंद अग्रवाल यांनी आज राजभवन येथे राज्यपालांकडून एक लाख रुपये रकमेचा धनादेश स्व‍िकारला. यावेळी सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल श्रीनिवास व्यवहारे हे उपस्थित होते.

महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती निमित्त टपाल विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने “ढाई आखर” पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत “प्रिय बापू अमर है” या व‍िषयावर आंतरदेश‍िय पत्र प्रवर्गात केलेल्या निबंध लेखनासाठी राज्यपालांना प्रथम क्रमाकाचे पारितोषीक प्राप्त झाले होते.  

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस