Join us

सागरी किनारा मार्गालगत हेलिपॅड उभारावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 09:31 IST

महापालिकेच्या २ लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई सागरी किनारी मार्गावर (कोस्टल रोड) हेलिपॅड उभारण्यासंदर्भातही मुंबई महापालिकेने विचार करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

महापालिकेच्या २ लाख कोटींच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आढावा घेतला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. बैठकीत शिंदे यांनी हेलिपॅड उभारण्यासंदर्भात सूचना केली. महापालिकेची ७०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण सुमारे २ हजार किमी रस्ते सिमेंट काँक्रीटचे होतील, असे शिंदे म्हणाले.

हेलिपॅडसाठी जागा नेमकी कुठे? 

कोस्टल रोड प्रकल्पासाठी वरळी येथे दोन तात्पुरत्या जेट्टी उभारण्यात आल्या आहेत. त्यात एक अमरसन्स गार्डनजवळ आणि दुसरी जेट्टी वरळी येथे वरळी डेअरीसमोर आहे. यातील वरळी जेट्टी पाडण्याचा प्रस्ताव नव्हता. सागरी पोलिसांनी पाळत ठेवण्यासाठी ही जागा मागितली होती. या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरण्यास परवानगी देण्याइतपत हा परिसर मोठा असल्याचे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

 

टॅग्स :एकनाथ शिंदे