Join us

एसटीवरच्या राजकीय जाहिरातींवर टाच, आगार व्यवस्थापकांना सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 05:49 IST

बस स्थानकात, आगारात तसेच एसटी बसवर विविध आस्थापनांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात.

मुंबई : आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी राजकीय जाहिराती काढून टाकण्याचे सत्र सुरू असतानाच एसटी महामंडळानेही एसटी बस, स्थानक आणि आगार परिसरातील जाहिराती हटविण्यास सुरुवात केली आहे. 

बस स्थानकात, आगारात तसेच एसटी बसवर विविध आस्थापनांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. त्या काढाव्यात असे आदेश आहेत. खासगी एजन्सीकडून राजकीय जाहिराती हटविल्या जात असल्या तरी सर्व बस आगारांमध्ये उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ही कारवाई तत्काळ करावी. एसटी बस कोणत्याही स्थितीत आगारात दाखल झाल्यास कर्मचाऱ्यांकडून राजकीय जाहिराती काढल्या जाव्यात.

एसटी बस इतर आगाराची किंवा इतर विभागाची आहे म्हणून जाहिराती काढण्यास टाळाटाळ करू नये आणि आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता आपआपल्या स्तरावर घ्यावी, अशा सूचना आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :एसटी