Join us

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी; पुण्याला जातानाच्या मार्गिकेवर रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 08:20 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गुरुवारी मोठा अपघात झाला होता. एका मागोमाग एक अशी ११ वाहने एकमेकांवर आदळली होती.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याला जातानाच्या मार्गिकेवर खंडाळा घाटाच्या सुरुवातीपासूनच मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. यामुळे या ठिकाणीच वाहनधारकांना तास तास लागत आहे. मुंबईच्या दिशेना जाणाऱ्या लेनवर तुरळक वाहतूक आहे. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गुरुवारी मोठा अपघात झाला होता. एका मागोमाग एक अशी ११ वाहने एकमेकांवर आदळली होती. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. परंतू वाहतूक मात्र मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. 

एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीचा आजचा हा दुसरा दिवस आहे. सकाळीच पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाल्याने अनेकांचे हाल झाले. आज कामकाजाचा आठवड्याचा अखेरचा दिवस असल्याने वाहनांची गर्दी होती. तसेच अवजड वाहने देखील मोठ्या प्रमाणावर होती. यामुळे खंडाळा घाटातील वेड्या वाकड्या वळणांवर वाहने अडकल्याने वाहतूक कोंडी झाली होती. 

टॅग्स :मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवाहतूक कोंडी