Join us  

मुंबई, कोकणात दमदार : कोल्हापूर, पुणे परिसरात घाटमाथ्यावर धुवाधार, विदर्भ, खान्देशातही पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 6:08 AM

जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढला. पुण्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला तर खान्देशात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली.विदर्भात रविवारी नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा व गोंदिया या पाच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली.

मुंबई : मुंबई व कोकण पट्ट्यात शनिवारपासून सुरू असलेल्या पावसाचा रविवारी दुपानंतर जोर ओसरला. शनिवारी कोकणात मुसळधार पाऊस झाला. विदर्भाती पाच जिल्ह्यांत रविवारी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूरजिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढला. पुण्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला तर खान्देशात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली.विदर्भात रविवारी नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा व गोंदिया या पाच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यात बहुतांश भागात धुवाधार पाऊस कोसळला. भंडारा जिल्ह्यात दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस झाला. नागपुरात शनिवारी मध्यरात्रीनंतर चांगला तर रविवारी दुपारनंतर पावसाची रिमझिम सुरू होती. मराठवाड्यात बीड जिल्ह्यात शनिवार रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत तुरळक हजेरी लावली.कोल्हापूरमध्ये नद्यांच्या पातळीत वाढकोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढला असून गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. आजरा, चंदगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू असून नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.सांगली जिल्ह्यात चांदोली धरणपरिसरात पावसाचा जोर वाढला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, नवजा, महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर आहे. कोकणात सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला आहे. दिवसभर अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात रविवारी ढगाळ वातावरण होते.खान्देशात पावसाची दमदार हजेरीजळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, अमळनेरसह भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर व बोदवडमध्ये चांगला पाऊस झाला. धुळ््यात शिरपूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. नंदुरबार जिल्ह्यात तुरळक सरी पडल्या.पुण्यात धरण क्षेत्रात हजेरीपुणे जिल्ह्यातील घाट परिसरात सध्या जोरदार पाऊस होत असला तरी पुणे शहर व परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे़ त्याचवेळी घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे़ पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी येथे रविवारी सकाळपर्यंत १६० मिमी तर लोणावळा येथे ११० मिमी पाऊस झाला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर ५५, वरसगाव ३३, पानशेत ३८ आणि खडकवासला येथे ४ मिमी पावसाची नोंद झाली.नांदूरमधमेश्वरमधून पाण्याचा विसर्गनाशिक जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे नांदूरमधमेश्वर बंधाºयातून पुन्हा एकदा विसर्ग करण्यात आला आहे. सकाळी ६ वाजता ४०४ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. दुपारी ३ वाजेपर्यंत विसर्ग कायम होता. बंधाºयात सुमारे ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

टॅग्स :पाऊसमुंबईमहाराष्ट्र