Join us

मुंबईसह ठाण्यात पावसाची मुसळधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 18:41 IST

मुंबई आणि उपनगरांसह ठाणे जिल्ह्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली.

मुंबई - मुंबई आणि उपनगरांसह ठाणे जिल्ह्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली.  शनिवारी सकाळापासून रिमझिम बरसत असलेल्या पावसाने रविवारी दुपारपासून चांगलाच जोर पकडला.  येत्या २४ तासांमध्येही मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडण्याच अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारपासून मुंबई आणि परिसरात पाऊस पुन्हा सक्रीय झाला होता. दरम्यान, शनिवारपेक्षा रविवारी पावसाचा जोर अधिक होता. रविवारी सकाळपासूनच आकाश ढगांनी आच्छादलेले होते. तसेच हवेतही बऱ्यापैकी गारवा जाणवत होता. मुंबईतील वरळी, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, बोरिवली परिसरात अधुनमधून मध्यम ते मुसळधार सरी कोसळत होत्या. ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातही पावसाचा जोर दिसून आला.  सुट्टीच्या दिवशी पाऊस पडत असल्याने मुंबईकरांना या पावसाचा मनसोक्त आनंद लुटला. 

 

टॅग्स :पाऊसमुंबईठाणे