Join us
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 06:45 IST

राज्यात नागपूरमध्ये सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमान

मुंबई : मे महिना संपत असतानाच कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथे कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. २५ आणि २६ मे रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमान ४६ अंशापर्यंत पोहोचले आहे. आता पुढील काही दिवस कमाल तापमानाचा पारा असाच चढा राहणार आहे.

२५ मे : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल.२६ मे : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.२७ मे : विदर्भात उष्णतेची लाट येईल.नागपूर ४६.५अकोला ४६अमरावती ४५.६चंद्रपूर ४५.६वर्धा ४५.५परभणी ४५.४गोंदिया ४५.४जळगाव ४५मालेगाव ४४.४सोलापूर ४४.२नांदेड ४४बुलडाणा ४३वाशिम ४२.६औरंगाबाद ४२.२सातारा ४०.१

टॅग्स :तापमानमराठवाडा