Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह कोकणात तीन दिवस उष्म्याचे; तापमान ३८ अंशांवर;  ८ मार्चपर्यंत उन्हाच्या झळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 07:11 IST

Heat Wave in Maharashtra: मुंबईचे कमाल तापमान बुधवारी ३८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळपर्यंत तापमान काहीसे दिलासादायक होते; मात्र दुपारी उन्हाची तीव्रता वाढली. सूर्य माथ्यावर आल्यानंतर वैशाख सुरू झाला की काय, असे वाटू लागले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दक्षिण राजस्थान आणि उत्तर गुजरातच्या सीमेवर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आणि उत्तर भारताकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे बुधवारी संपूर्ण कोकणपट्टा तापला होता. तापमानात अचानक लक्षणीय वाढ झाल्याने महामुंबई परिसरातील नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण झाले. पुढील तीन दिवस तापदायक असतील, असा अंदाज हवमानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.  

मुंबईचे कमाल तापमान बुधवारी ३८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळपर्यंत तापमान काहीसे दिलासादायक होते; मात्र दुपारी उन्हाची तीव्रता वाढली. सूर्य माथ्यावर आल्यानंतर वैशाख सुरू झाला की काय, असे वाटू लागले. 

दक्षिण मुंबईपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरांपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारी १२ नंतर उष्ण वाऱ्याचे चटके बसू लागले. दुपारी दोन ते तीनदरम्यान उन्हाची तीव्रता वाढल्याने जिवाची काहिली होऊ लागली. लोकल आणि बसच्या प्रवाशांना उन्हाच्या झळांनी हैराण केले. सूर्यास्तापर्यंत असेच वातावरण होते. महाराष्ट्राकडे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज असला तरी ८ मार्चपर्यंत कोकण पट्ट्यात उष्णतेची लाट कायम राहू शकते, असा अंदाज हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी व्यक्त केला.

काय आहे अंदाज? पुढील तीन दिवस कमाल तापमान चढेच राहील. मार्चची सुरुवातच उष्णतेच्या लाटेसदृष स्थितीने झाल्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असेल. 

गुजरातमध्ये निर्माण झालेल्या अँटी-सायक्लोनमधून उष्ण वारे महाराष्ट्राकडे येत आहेत. परिणामी, कोकणपट्ट्यात तापमान वाढले आहे. सुषमा नायर, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान विभाग

१० वर्षांतील मार्चमधील उच्चांकी तापमानदिनांक व वर्ष    तापमान१२ मार्च २०२५    ३९.२२२ मार्च २०२४    ३८.८१३ मार्च २०२३    ३९.४१५ मार्च २०२२    ३९.६२८ मार्च २०२१    ४०.९१७ मार्च २०२०    ३७.५२६ मार्च २०१९    ४०.३२६ मार्च २०१८    ४१२८ मार्च २०१७    ३८.४२४ मार्च २०१६    ३८.२२६ मार्च २०१५    ४०.८१८ मार्च २०१४    ३८

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai and Konkan brace for three days of heatwave.

Web Summary : Mumbai and Konkan are experiencing a heatwave with temperatures reaching 38°C. High pressure and hot winds are causing discomfort. The heatwave is expected to persist until March 8, with slight relief possible on Thursday. This March heat could signal a harsh summer.
टॅग्स :उष्माघात