Join us  

मनसेतून शिवसेनेत आलेल्या 'त्या' नगरसेवकांना तात्पुरता दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 1:09 PM

कोकण आयुक्त गैरहजर राहिल्यानं सुनावणी पुढे ढकलली

मुंबई: मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. कोकणचे आयुक्त जगदीश पाटील गैरहजर राहिल्यानं या प्रकरणाची सुनावणी ढकलण्यात आली आहे. याबद्दल मनसेनं आक्षेप घेतला असून कोकण आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या हातचं बाहुलं झाल्याची टीका केली आहे. दिलीप लांडे यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. याला मनसेनं कोकण आयुक्तांकडे आव्हान दिलं. तीन महिन्यांमध्ये या प्रकरणाचा निकाल अपेक्षित होता. मात्र चार महिने उलटूनही हे प्रकरणा निकाली निघालेलं नाही. कोकणचे आयुक्त जगदीश पाटील सतत गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसेला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता.

टॅग्स :शिवसेनामनसेराज ठाकरेउद्धव ठाकरे