उपचार घेण्यासाठीच्या अडचणी दवाखान्यात नाही, तर त्याआधीच सुरू होतात. जास्त अंतर, महागाई आणि उपचार मिळण्याची खात्री नसल्यामुळे अनेक गरजू लोक दवाखान्यातच येत नाहीत. हीच अडचण दूर करण्यासाठी ‘हेल्थनोव्हो’ देत आहे एक ‘हेल्थ कार्ड’ तेही फक्त १५० रुपयांत. हे कार्ड त्यांच्या ‘फर्स्ट माइल’ दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी असेल.
गरजू लोकांसाठी हे कार्ड महत्त्वाचं असून यामुळे प्राथमिक उपचार स्वस्त, खात्रीशीर आणि नियमित होणार आहेत. हे कार्ड संपूर्ण वर्षभरासाठी वैध असेल. यामध्ये डॉक्टरांकडून मोफत वैद्यकीय सल्ला, औषधं आणि डायग्नोस्टिक टेस्ट्सवर सुयोग्य सवलती मिळतील. कार्डधारकांसाठी ब्रँडेड औषधांवर १०-१५%, जेनेरिक औषधांवर ३०-८०% आणि ‘हेल्थनोव्हो’मार्फत बुक केलेल्या टेस्ट्सवर २०-३०% सवलतींची हमी आहे.
ही योजना ‘हेल्थनोव्हो’च्या ‘फर्स्ट माइल’ दवाखान्यांवर सुरू झाली आहे. असे दवाखाने मुंबईमधल्या पुढील सहा रेल्वेस्थानकांजवळ आहेत - मरीन लाइन्स, प्रभादेवी, वांद्रे, सांताक्रूझ, जोगेश्वरी पूर्व आणि गोरेगाव पश्चिम. या ठिकाणी रुग्ण त्यांच्या नेहमीच्या तपासणीसाठी या कार्डचा लाभ घेत आहेत. स्वस्तात डॉक्टरांचा सल्ला, औषधं आणि टेस्ट्स उपलब्ध झाल्यावर रुग्ण फॉलो-अप उपचारांसाठी वेळेवर येतात आणि पैशांअभावी उपचार थांबत नाही.
‘हेल्थनोव्हो’चं हेल्थ कार्ड मुद्दाम सोपं बनवलं आहे. त्यात आरोग्य विम्यासारखे गुंतागुंतीचे नियम नाहीत किंवा अल्पकालीन योजनांचं आमिषही नाही. एकदाच भरलेल्या १५० रुपयांत रुग्णांना वर्षभरासाठी स्वस्त प्राथमिक उपचाराचा फायदा मिळतो. या सुविधाही जवळच्याच दवाखान्यांमध्ये उपलब्ध होतात आणि इथेच बहुतेक लोकांची निरोगी आयुष्याकडे वाटचाल सुरू होते.
अनेक दवाखाने, डायग्नोस्टिक टेस्ट सेंटर्स आणि औषधांच्या दुकानांनाबरोबर घेऊन ‘हेल्थनोव्हो’ मोठं आरोग्य नेटवर्क उभारत आहे. १५० रुपयांचं हेल्थ कार्ड असलेल्या संस्थेचे ब्रीदवाक्य हेच सांगतं की, "परवडणारा उपचार ‘फर्स्ट माइल’ असायला हवा, लास्ट माइल नव्हे."
Web Summary : Healthnovo offers a ₹150 health card for affordable primary care at its 'First Mile' clinics. Valid for a year, it provides free doctor consultations and discounts on medicines and diagnostic tests at clinics near railway stations.
Web Summary : हेल्थनोवो अपने 'फर्स्ट माइल' क्लीनिकों में किफायती प्राथमिक उपचार के लिए ₹150 का हेल्थ कार्ड प्रदान करता है। एक वर्ष के लिए वैध, यह रेलवे स्टेशनों के पास क्लीनिकों में मुफ्त डॉक्टर परामर्श और दवाओं व डायग्नोस्टिक परीक्षणों पर छूट प्रदान करता है।