Join us  

राज्यात मार्चअखेर ६,५०० आरोग्यवर्धिनी केंद्र - आरोग्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 7:11 AM

आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे टप्प्याटप्प्याने आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर केले जात आहेत.

मुंबई : आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे टप्प्याटप्प्याने आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर केले जात आहेत. मार्चअखेर एकूण सुमारे ६ हजार ५०० आरोग्यवर्धिनी केंद्रे राज्यात कार्यान्वित होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद व नंदुरबार हे राज्यातील चार आकांक्षित जिल्हे, तसेच भंडारा, चंद्रपूर, वर्धा, सातारा, पालघर, नाशिक, लातूर, पुणे, अहमदनगर, नांदेड, हिंगोली, गोंदिया, अमरावती, सिंधुदुर्ग, जळगाव असे १९ जिल्ह्यांतील एकूण १,१६९ आरोग्य उपकेंद्रांचे व सर्व जिल्ह्यांतील १,५०१ (ग्रामीण भागातील) व ४१३ (शहरी भागातील) प्राथमिक आरोग्य केंद्र असे एकूण ३,०८३ आरोग्यकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केद्रांमध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे.दुसऱ्या टप्प्यात जालना, बीड, परभणी या सारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांसह उर्वरित जिल्ह्यात ही केंद्रे सुरू होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या केंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर आयुर्वेद, युनानी, नर्सिंग पदवीधारक नियुक्त केले जाणार आहेत. आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये व त्याअंतर्गत येणाºया गावांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा शासनाचा मानस असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.आधुनिक जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य रोगांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या दिल्या जाणाºया माता बालसंगोपन आरोग्य सेवांमध्ये वाढ करून असंसर्गजन्य आजार तपासणीसाठी आरोग्य सेवा आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून पुरविण्याचे उद्दिष्ट आहे.समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षणनिवड झालेल्या समुदाय आरोग्य अधिकाºयांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येते. २०१९-२० मध्ये पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३,६९६ (आयुर्वेदिक २,३८८, युनानी २३३ व बी.एस्सी. नर्सिंग १,०७५) समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रशिक्षण आॅगस्ट, २०१९ पासून सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षित समुदाय आरोग्य अधिकारी हे निकास परीक्षा उत्तीर्ण होऊन फेब्रुवारी, २०२०पासून आरोग्य उपकेंद्रांवर कार्यरत होतील. त्यामुळे मार्चपासून अजून ३,५०० आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित होतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये १३ प्रकारच्या सेवाप्रसूतिपूर्व व प्रसूती सेवा, नवजात अर्भक व नवजात बालकांना दिल्या जाणाºया सेवा, बाल्य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा, कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक व आवश्यक आरोग्य सेवा, संसर्गजन्य रोग नियोजन व सामान्य रोगांधी बाह्यरुग्ण सेवा, संसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी, असंसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी, मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी, नाक, कान, घसा व डोळे सामान्य आजारांसंबंधी सेवा, दंत व मुखरोग आरोग्य सेवा, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा आणि आयुष व योग यासंदर्भात सेवा दिल्या जातील.

टॅग्स :आरोग्यमहाराष्ट्र सरकार