बायकोशी झालेल्या भांडणाचा राग त्यानं एसी लोकलवर काढला, दगडफेक करत काचच फोडली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 16:37 IST2023-10-03T16:36:48+5:302023-10-03T16:37:30+5:30
मुंबईत सोमवारी एका व्यक्तीनं चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या एसी लोकलवर दगडफेक केल्याची घटना घडली.

बायकोशी झालेल्या भांडणाचा राग त्यानं एसी लोकलवर काढला, दगडफेक करत काचच फोडली!
मुंबईत सोमवारी एका व्यक्तीनं चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या एसी लोकलवर दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि चौकशीत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. बायकोसोबत झालेल्या भांडणाचा राग डोक्यात धरुन आरोपीनं एसी लोकलवर दगडफेक केल्याचं निष्पन्न झालं आहे.
ही घटना सोमवारी दुपारी घडली. दगडफेकीत सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. पण एसी लोकलचं मात्र नुकसान झालं आहे. एसी लोकलला डबल काचेच संरक्षण असतं त्यामुळे तरुणानं भिरकावलेला दगड दोन काचांच्या मध्येच अडकला. यामुळे काच फुटली पण कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. मात्र अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
कांदिवली आणि बोरीवलीच्या दरम्यान दुपारी ३.३८ मिनिटांनी ही घटना घडली होती. रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेत तरुणाचा शोध घेतला. चौकशीत तरुणानं घरात बायकोशी झालेल्या भांडणातून असं कृत्य केल्याचं सांगितलं आहे.