फेरीवाल्यांना मिळतोय ५० हजारांचा ‘स्वनिधी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:24 IST2025-10-11T10:24:31+5:302025-10-11T10:24:37+5:30
योजनेतून फेरीवाल्यांना विनातारण कर्ज देऊन त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची संधी मिळाली आहे.

फेरीवाल्यांना मिळतोय ५० हजारांचा ‘स्वनिधी’
मुंबई : कोविड काळात व्यवसाय गमावलेल्या आणि पुन्हा उभे राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ मोठा आधार ठरली आहे. या योजनेतून फेरीवाल्यांना विनातारण कर्ज देऊन त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची संधी मिळाली आहे.
कर्ज मर्यादा आणि लाभ
या योजनेत पहिल्या टप्प्यात १० हजार रुपयापर्यंत कर्ज, वेळेवर परतफेड केल्यास दुसऱ्या टप्प्यात २० हजार आणि त्यानंतर ५० हजारपर्यंत कर्ज मिळू शकते.
लाभार्थी कोण?
शहरी आणि बिगर फेरीवाले या योजनेचे प्रमुख लाभार्थी आहेत.
अर्ज प्रक्रिया सोपी
या योजनेसाठी अर्ज www.pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर करता येतो.
मुंबई किती लाभार्थी ?
महानगर क्षेत्रातील २५ टक्के फेरीवाले या योजनेत पात्र आहेत. मात्र, बऱ्याच फेरीवाल्यांकडे नोंदणी प्रमाणपत्र, बँक खाते, आधार कार्ड आदी कागदपत्रे नसल्यामुळे ते अर्ज घेऊ शकलेले नाहीत.
समस्या आणि आव्हाने
अनेक फेरीवाल्यांना या योजनेची माहिती नाही किंवा चुकीची माहिती आहे.
फेरीवाले अनेकदा ‘वेंडर सर्टिफिकेट’ किंवा स्थानिक मंजुरी नसलेली स्थितीत आहेत.
व्यवसाय न चालू होणे, महसूल कमी होणे, अन्य गरजांमुळे परतफेड होणे कठीण होते.
काही फेरीवाल्यांकडे स्मार्टफोन नसणे, डिजिटल व्यवहाराचा अनुभव नसेल, किंवा प्रदीर्घ प्रक्रियेमुळे ते वापरणे टाळतात.