Join us  

उष्णतेच्या लाटेचा कहर; पारा ४४ अंश : मुंबईकर ऊकाड्याने त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 6:01 PM

गेल्या २४ तासांत देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून आंध्रप्रदेशातील विजयवाडा शहराची नोंद झाली आहे.

मुंबई : गेल्या २४ तासांत देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून आंध्रप्रदेशातील विजयवाडा शहराची नोंद झाली आहे. येथील कमाल तापमान ४६ अंश नोंदविण्यात आले आहे. मध्य भारतातील राज्यांमध्ये पुन्हा एकदा कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. उष्ण शहरांच्या यादीत आंध्रप्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशातील शहरांचा समावेश असून, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४ ते ३५ अंशावर स्थिर असले तरी वाढता ऊकाडा मात्र मुंबईकरांचा घाम काढत असून, राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ४४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.

प्री-मान्सून हंगामातील दोन महिले उलटले आहेत. तिसरा म्हणजे मे महिनादेखील आता संपण्याच्या मार्गावर आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात देशातील बहुतांश ठिकाणी उष्णता वाढली होती. मात्र उत्तर, पूर्व, दक्षिण भारतात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. परिणामी तापमानदेखील वाढले नाही. शिवाय त्यामुळे देशात उष्णतेची लाटदेखील कमी प्रमाणात आली. मात्र आता पुन्हा विशेषत: मध्य भारतात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 

--------------------

ठळक नोंदी२३ ते २५ मे : विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.गेल्या २४ तासांत गोव्यासह संपुर्ण राज्यात हवामान कोरडे होते.राज्याच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.२३ आणि २४ मे रोजी मुंबईतील आकाश अंशत: ढगाळ राहील.--------------------

तापलेली शहरेजळगाव ४४.४मालेगाव ४२.८सोलापूर ४३औरंगाबाद ४०.८परभणी ४३.९नांदेड ४२.५अकोला ४४.२अमरावती ४२.२बुलडाणा ४०चंद्रपूर ४४.२गोंदिया ४३नागपूर ४४.५वाशिम ४२.४वर्धा ४३.२

 

टॅग्स :उष्माघातमुंबईमहाराष्ट्र