लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विद्यार्थ्यांचे ‘अपार’ ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. मुंबईत अडीच लाख विद्यार्थ्यांच्या पालकांनी अपार आयडी करिता अर्ज नोंदणी केलेली नाही. आतापर्यंत १५ लाख ६४ हजार ८७१ विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट झाले आहेत. ठरलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी देण्यात येणारा एकात्मिक शैक्षणिक ओळख क्रमांक म्हणजे अपार आयडी होय. तो नसल्यास डिजिटल शैक्षणिक नोंदींमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत असे आवाहनही करण्यात येत आहे.
अनेक तांत्रिक अडथळे
आधार कार्ड व शालेय नोंदीदरम्यान नावात तफावत, पालकांची माहिती अपूर्ण असणे, तसेच तांत्रिक अडथळे या प्रमुख अडचणी येतात.
आयडीसाठी सक्ती नाही
शाळेमार्फत किंवा अधिकृत पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करून अपार आयडी तयार करता येतो. अपार आयडीसाठी पालकांचे संमती पत्र पालकांनी भरून स्वाक्षरी करून शाळेमध्ये देणे आवश्यक असते. मात्र, शासनाकडून अपार आयडीसाठी सक्ती केलेली नाही.
अपार आयडीमुळे स्वतःचे प्रमाणपत्र केव्हाही कुठेही डाउनलोड करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी अपार आयडीसाठी अर्ज नोंदणी करण्याचा सूचना दिल्या आहेत.-संजय जावीर, शिक्षण निरीक्षक, शिक्षण विभाग
Web Summary : Government sets January 31 deadline for students' 'Apar ID'. Many Mumbai parents haven't registered. This unique ID facilitates digital educational records, but technical issues hinder progress. Registration isn't mandatory, yet it allows easy certificate access.
Web Summary : सरकार ने छात्रों के 'अपार आईडी' के लिए 31 जनवरी की समय सीमा तय की। मुंबई में कई माता-पिता ने पंजीकरण नहीं कराया है। यह आईडी डिजिटल शैक्षिक रिकॉर्ड को आसान बनाता है, लेकिन तकनीकी समस्याएँ आ रही हैं। पंजीकरण अनिवार्य नहीं है, फिर भी यह प्रमाणपत्रों तक आसान पहुंच प्रदान करता है।