Join us  

उच्चभ्रूंच्या वस्तीतल्या घरांचा दरही घसरले ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 6:43 PM

Real Estate : एका चौरस फुटासाठी १ लाख २२ हजारांचा दर

दक्षिण मुंबईत तीन महिन्यांत ३५ हजारांची घट

मुंबई : दक्षिण मुंबईतल्या कार्माइकल रेसिडेन्सीमधिल या लक्झरी इमारतीतली दोन घरांची जुलै महिन्यांत १ लाख ५७ हजार रुपये प्रति चौरस फुट दराने विक्री झाली होती. गेल्या आठवड्यात त्याच इमारतीतल्या घरासाठी प्रति चौरस फूट १ लाख २२ हजार रुपये मोजण्यात आले आहेत. कोरोना संक्रमणामुळे मुंबईतल्या उच्चभ्रूंच्या घरांचे दर कमी होत असल्याची चर्चा सुरू झाली असली तरी इमारतीचा मजला आणि लोकेशनमुळेसुध्दा किंमती कमी जास्त होत असल्याचे रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

प्रख्यात उद्योजक अनुराग जैन यांनी कार्माइकल रेसिडेन्सी या २२ मजली इमारतीतल्या १९ व्या मजल्यावरील ६३७० चौरस फुट क्षेत्रफळ असलेली दोन घरे जुलै, २०२० मध्ये तब्बल १०० कोटी रुपयांना खरेदी केली होती. मुंबईतली या वर्षातला हा सर्वात मोठा गृहखरेदीचा व्यवहार असल्याचे सांगितले जात होते. याच इमारतीच्या सातल्या मजल्यावरील ३ हजार १८४ चौरस फुटांचा फ्लँटही जैन यांनी गेल्या आठवड्यात खरेदी केला असून त्याची किंमत ३९ कोटी रुपये इतकी आहे. या इमारतीच्या प्रत्येक फ्लँटसाठी चार कार पार्किंग देण्यात आलेली आहे. परंतु, या दोन्ही व्यवहारांतील प्रति चौरस फुट दरांमध्ये तब्बल ३५ हजार रुपयांची तफावत आहे.

जैन यांच्या १९ व्या मजल्यावरील दोन फ्लँटमधून एका बाजूला अरबी समुद्र तर दुस-या बाजूला मुंबई शहराचे विहंगम दृष्य दिसते. सातव्या मजल्यावरून तो व्ह्यू मिळत नसल्याने किंमत कमी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोरोनामुळेसुध्दा या परिसरातील घरांचे दर कमी होत असल्याच्या वृत्ताला रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित सल्लागार संस्थांच्या प्रतिनिधींकडून दुजोरा दिला जात आहे.

मुद्रांक शुल्कात घट

जुलै महिन्यांत प्रत्येक फ्लँटसाठी झालेल्या व्यवहारातून राज्य सरकारच्या तिजोरीत अडीच कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क जमा झाले होते. मात्र, आता सरकारने मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलत दिल्यामुळे ८४ लाखच रुपये सरकारला मिळाले आहेत.  

टॅग्स :बांधकाम उद्योगमुंबईमहाराष्ट्र