Join us  

राष्ट्रीय सहकारी साखर संघ अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील बिनविरोध; ५० वर्षात पहिल्यांदाच भाजपचं वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 12:41 PM

राष्ट्रीय सहकारी साखर संघ अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील बिनविरोध निवड झाली आहे.

Harshvardhan Patil ( Marathi News ) मुंबई- राष्ट्रीय सहकारी साखर संघ अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील बिनविरोध निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी केतनभाई पटेल यांनी निवड झाली आहे. ५० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकारी साखर संघावर भाजपची सत्ता आली आहे. राज्यसभा तिकिट नाकारल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन करण्याचे काम सुरू आहे. 

जुन्या कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट 

काही दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील यांना राज्यसभेची उमेदवारीची चर्चा सुरू होती. दरम्यान, काल उमेदवारांची यादी समोर आली यात अशोक चव्हाण यांचे नाव समोर आले. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय पुनवर्सन करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. 

हर्षवर्धन पाटील यांची २०१९ मध्ये राष्ट्रीय साखर संघाच्या संचालक पदी निवड करण्यात आली होती. दरम्यान, आता पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकारी साखर संघावर पहिल्यांदाच भाजपचे वर्चस्व आहे. राज्यात साखर कारकानदारी मोठ्या प्रमाणात आहे, राज्यातील राजकारण सहकारी कारखान्याच्या माध्यमातून चालते, त्यामुळे राष्ट्रीय सहकारी साखर संघ ही एक महत्वाची संस्था आहे.  

टॅग्स :हर्षवर्धन पाटीलभाजपा