Join us

चुनाभट्टी येथे रेल्वे रुळावर भिंत कोसळल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 20:50 IST

Wall Collapsed : चुनाभट्टी येथे रेल्वे रुळांलगत असणाऱ्या रेल्वे इंजिन वर्कशॉप मध्ये मंगळवारी काही तोडकाम सुरू होते.

ठळक मुद्देही घटना घडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी ताबडतोब रेल्वे रुळांवर पडलेला ढिगारा काढण्यास सुरुवात केली.

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील चुनाभट्टी फाटकाच्या जवळ असणाऱ्या रेल्वे इंजिनीयर वर्कशॉपची संरक्षक भिंत रेल्वे रुळांवर कोसळली. मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कुर्ला ते चुनाभट्टीच्या दरम्यान ही घटना घडली. यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक एक तासासाठी विस्कळीत झाली होती. चुनाभट्टी येथे रेल्वे रुळांलगत असणाऱ्या रेल्वे इंजिन वर्कशॉपमध्ये मंगळवारी काही तोडकाम सुरू होते.

हे काम सुरू असताना साडेचारच्या सुमारास अचानक येथील संरक्षक भिंत रेल्वे रुळांवर कोसळली. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी सीएसटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळित झाली होती. ही घटना घडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी ताबडतोब रेल्वे रुळांवर पडलेला ढिगारा काढण्यास सुरुवात केली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून एक तासाने रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

टॅग्स :रेल्वेहार्बर रेल्वे