Join us  

हँकॉक पुल : बाधित कुटुंबाना परिसरातच पुनर्वसित करा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 3:12 PM

Hancock bridge : थॉवर पट्टा बचाव समिती आक्रमक  

मुंबई : हँकॉक पुलासाठी शिवदास चपसी मार्गावर रस्ता रुंदीकरण होणार असून, यात बाधित होत असलेल्या निवासी इमारतींचे स्थानिक परिसरातच पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. थॉवर पट्टा बचाव समिती यासाठी आक्रमक झाली असून, समितीच्या म्हणण्यानुसार सरकारने मदत केली नाही तर बाधित इमारतीमधील जवळपास ३५० कुटुंब ही या विभागाला  कायमची मुकणार आहेत.

हँकॉक पुलाच्या रस्ता रुंदीकरणासाठी बाधित झालेल्या ७ इमारती अनुक्रमे मेघाजी इमारत, थॉवर मेशन ४, थॉवर मेशन ३, शेखभाई इमारत, थॉवर मेंन्स नंबर २, प्रगती इमारत, सकिना बाई मेंशन, श्यामजी अशा आहेत. या मधील जवळपास ३५० कुटुंब रस्ता रुंदीकरणासाठी बाधित झाली आहेत. या इमारती ब्रिटीश कालीन असून १९२० म्हणजे जवळ जवळ १०० वर्ष जुन्या आहेत. महानगरपालिकेच्या इ विभागाकडून सदर इमारतीचा सर्वे सुद्धा करण्यात आला आहे. तर काही दुकाने, इमारतीला नोटिससुद्धा लागली आहे. थॉवर मेंशन ३ या इमारतीमधील कुटुंब ही संक्रमण शिबिरात जवळपास ४५ वर्षे वास्तव्य करीत आहेत. विभागातील जनतेला/३५० कुटुंबाना याच परिसरात पुनर्वसन होण्यासाठी थॉवर पट्टा बचाव समिती स्थापना करण्यात आली आहे.

समितीच्या माध्यमातून याच परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या राखीव भूखंड बाबत महानगरपालिका ई विभागाला ह्या निवेदना मार्फत ओलेन्स फॉर्च्युना अतुल अरकडे आणि ई विभाग यांच्या मध्ये झालेल्या ५-जून-२०१२ च्या करारानुसार सदर राखीव भूखंड सी एस न.१४८२ ( पार्ट) सुविधा क्षेत्र ७०२.२९ चौरस मीटर इतकी मोकळी जागा महानगरपालिके कडे राखीव आहे. सदर, राखीव भूखंडाचा अजूनही विकास करण्यात आला नाही. म्हणून थॉवर पट्टा बचाव समिती महापालिकेकडे ह्या भूखंडावर बाधित कुटुंबाचे पुनर्वसन करावे, असे म्हणणे मांडत आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्राचे राज्य सचिव समीर विजय शिरवडकर यांनी सांगितले.

दरम्यान, येथील काही इमारती म्हाडाच्या सेसमध्ये आहेत तर काही इमारती महानगरपालिकाच्या अंतर्गत आहेत. विभागातील जनतेचा विकास कामाला विरोध नाही. पंरतु इमारती ज्या विभागाच्या ताब्यात आहे  त्या विभागाने सर्वे बाधित लोकांना याच विभागात घर आणि मोबदला देण्यात यावा. प्रगती इमारतीमधील रंजन माळी यांनी यासाठी अनेक पत्रव्यवहार केले आहेत. यासाठी सर्वे इमारतीमधील प्रतिनिधी रंजन माळी, ललित मालवणकर, गिरीष बवले, विलास पाटील, रमेश पाटील, नरेश वेतकर, अमित मालवणकर, सुभाष घासे आदी काम करत आहेत.   

टॅग्स :मुंबई महानगरपालिकारेल्वेमुंबईबांधकाम उद्योगसरकार