वरळीतील १६९ बेकायदा बांधकामांवर हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:13 IST2025-10-18T14:12:18+5:302025-10-18T14:13:59+5:30
या कारवाईमुळे परिसरातील पावसाचे पाणी साचण्याच्या तक्रारींना आळा बसण्याची शक्यता आहे.

वरळीतील १६९ बेकायदा बांधकामांवर हातोडा
मुंबई : वरळी येथील खान अब्दुल गफार खान मार्गावरील मद्रासवाडी परिसरातील १६९ अनधिकृत बांधकामे मुंबई महानगरपालिकेच्या जी (दक्षिण) विभागाकडून शुक्रवारी पाडण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील पावसाचे पाणी साचण्याच्या तक्रारींना आळा बसण्याची शक्यता आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी उपायुक्त प्रशांत सपकाळे आणि जी (दक्षिण) विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही करण्यात आली, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.