पालिका, खासगी रुग्णालयात काेराेना रुग्णांसाठीच्या निम्म्या खाटा रिकाम्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 08:48 AM2021-05-18T08:48:07+5:302021-05-18T08:48:54+5:30

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यान्हपासून मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला. गेल्या दोन महिन्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा ९२ हजारांवर पोहोचला होता.

Half of the beds for Corona patients in municipal, private hospitals are empty | पालिका, खासगी रुग्णालयात काेराेना रुग्णांसाठीच्या निम्म्या खाटा रिकाम्या

पालिका, खासगी रुग्णालयात काेराेना रुग्णांसाठीच्या निम्म्या खाटा रिकाम्या

Next

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग आता पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याचे चिन्हे आहेत. मुंबईत सध्या ३५ हजार ७०२ सक्रीय रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईतील १७८ पालिका आणि खासगी रुग्णालयांमधील तब्बल दहा हजार ९८४ खाटा रिकाम्या आहेत, यात अतिदक्षता विभागातील ३७० तर १०४ व्हेंटिलेटर खाटांचा समावेश आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यान्हपासून मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला. गेल्या दोन महिन्यांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा ९२ हजारांवर पोहोचला होता. त्यामुळे पालिका आणि खासगी रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नव्हत्या. मात्र, मुंबईत कडक निर्बंध लागू केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग आता नियंत्रणात आला आहे. गेल्या महिन्यात दररोज नऊ ते दहा हजार बाधित रुग्ण आढळून येत होते. आता दररोज दीड हजार रुग्णांची नोंद होत आहे. आतापर्यंत सहा लाख ८८ हजार ६९६ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सहा लाख ३६ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.२८ टक्के एवढा आहे, तर कोरोना रुग्णांची संख्या २४६ दिवसांनी दुप्पट होत आहेत.

आयसीयू ३७०, व्हेंटिलेटर १०४ खाटा रिक्त
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अतिदक्षता विभागातील खाटांची मागणी वाढली होती. त्यामुळे अनेक रुग्णांची गैरसोय होत होती, तसेच व्हेंटिलेटर खाटांचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत होता. मात्र, आता रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यामुळे अतिदक्षता विभागात ३७० खाटा तर व्हेंटिलेटरच्या १०४ खाटा रिकाम्या आहेत.

Web Title: Half of the beds for Corona patients in municipal, private hospitals are empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.