स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम सातपुतेंचा राहत्या घरी आढळला मृतदेह, अपघाती मृत्यूची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 14:55 IST2017-12-27T14:47:32+5:302017-12-27T14:55:07+5:30
एका फ्लॅटमध्ये महिला डॉक्तरचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली.

स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम सातपुतेंचा राहत्या घरी आढळला मृतदेह, अपघाती मृत्यूची नोंद
मुंबई: एका फ्लॅटमध्ये महिला डॉक्तरचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. डॉ पूनम सातपुते (४०) असं या डॉक्तरचं नाव असून त्या स्त्रीरोग तज्ज्ञ असल्याचं समजतं. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधीक चौकशी सुरु आहे.
अंधेरीच्या चार बांगला परिसरात असलेल्या गायकवाड हॉलसमोरील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सातपुते एकट्याच राहत होत्या. त्यांच्या फ्लॅटमधून उग्र वास येत असल्याची तक्रार त्यांच्या शेजाऱ्यानी बुधवारी सकाळी पोलीस नियंत्रण कक्षावर केली. त्यानुसार अंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सातपुते यांच्या घरच्यांसमोर फ्लॅटचा दरवाजा उघडण्यात आला. जिथे सातपुते यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यांना त्वरित कूपर रुग्णालयात हलविण्यात आले. जीथे डॉक्तरने त्यांना तपासुन मृत घोषित केले.त्यांचा मृतदेह शववीच्छेदनासाठी पाठविण्यात आला. ज्यात सातपुते यांचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे डॉक्तरांनी सांगितले.सातपुते या मधुमेहाने ग्रस्त होत्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला असून यात कोणत्याही प्रकारचा घातपात नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी नमुद केले.