Join us
Daily Top 2Weekly Top 5

Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरेंनी लावलेला गुलमोहर कोसळला; स्मृतीस्थळाला नुकसान न करता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 11:20 IST

स्मृतीस्थळाच्या भिंतीच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. हे झाड स्मृतीस्थळाच्या बाजुलाच असले तरी विरुद्ध दिशेला कोसळल्याने मोठे नुकसान टळले

दादरच्या शिवाजी पार्कमधील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले आहे. महत्वाचे म्हणजे हे गुलमोहराचे झाड बाळासाहेबांनीच लावले होते. 

गुलमोहराचे झाड कोसळल्याने स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्मृतीस्थळावर पाहणी केली. 

स्मृतीस्थळाच्या भिंतीच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. हे झाड स्मृतीस्थळाच्या बाजुलाच असले तरी विरुद्ध दिशेला कोसळल्याने मोठे नुकसान टळले.  

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेशिवसेना