गुजरात, महाराष्ट्र, गोव्यात सर्वत्र जोरदार बरसणार, हवामान खात्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 06:46 IST2020-08-20T04:12:18+5:302020-08-20T06:46:39+5:30
येत्या ४-५ दिवसांत गुजरात, महाराष्ट्र व गोव्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

गुजरात, महाराष्ट्र, गोव्यात सर्वत्र जोरदार बरसणार, हवामान खात्याचा इशारा
मुंबई : उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र असून २४ तासांत हे अधिक तीव्र होण्याची व पुढच्या ३-४ दिवसांत पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ४-५ दिवसांत गुजरात, महाराष्ट्र व गोव्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबईत कुलाबा आणि सांताक्रुझ येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजता अनुक्रमे १३, ११.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी किंचित कोसळलेल्या पावसाने त्यानंतर विश्रांती घेतली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे ऊन गायब झाले
होते. मात्र, बुधवारी दुपारी शहर, उपनगरात बऱ्यापैकी ऊन पडलेले पाहायला मिळाले. तरीही ठिकठिकाणी पडझड सुरूच होती. ४ ठिकाणी घरांचा भाग कोसळला. ८ ठिकाणी झाडे पडली तर ७ ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
>पावसाची नोंद (मिमीमध्ये)
शहर १६.७३ । पूर्व उपनगर २४.२१ । पश्चिम उपनगर १९.४४