जीएसटी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:53 IST2019-06-22T00:53:38+5:302019-06-22T00:53:49+5:30
राज्य सरकारच्या जीएसटी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, अशी मागणी राज्यकर कंत्राटी कर्मचारी संघटनेने केली आहे.

जीएसटी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
मुंबई : राज्य सरकारच्या जीएसटी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, अशी मागणी राज्यकर कंत्राटी कर्मचारी संघटनेने केली आहे. जीएसटी विभागातील कंत्राटी कर्मचाºयांना शासनाच्या इतर विविध सेवेत सामावून घेण्याबाबत आझाद मैदानात शुक्रवारी आंदोलन केले. शासनाने त्याची दखल न घेतल्याने सोमवारपासून पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत राज्यकर कंत्राटी कर्मचारी संघटनेचे कार्यवाहक सुकन्या किर हिने सांगितले की, सध्या राज्य सरकारच्या जीएसटी विभागात काम करणारे कंत्राटी कर्मचारी गेल्या ८ ते १० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनेच काम करत आहेत. एक वर्ष झालेल्या आणि १० वर्षे झालेल्या कर्मचाºयालाही समान वेतन आहे. या कर्मचाºयांना कायम सेवेत घ्यावे किंवा त्यांचा पर्यायी सेवेत समावेश करावा.
गेल्या नोव्हेंबरपासून तीन महिन्यांचे वेतन रखडल्यामुळे कर्मचाºयांनी जानेवारीत कामबंद आंदोलन केले. त्यानंतर, त्यांना वेतन मिळाले, परंतु मार्च महिन्यापासून कंत्राट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ७०० कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. शासनाला कर्मचाºयांची आवश्यकता असतानाही त्यांना घरी बसविण्यात आले आहे, असा आरोपही किर यांनी केला.
दरम्यान, जीएसटी विभागातील कंत्राटी कर्मचाºयांची राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. शिवाय विधानपरिषदेत कंत्राटी कर्मचाºयांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.